

बृहन महाराष्ट्र मंडळ, नॉर्थ अमेरिका

बृहन महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली

छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार
मुख्य सहयोगी संस्था
३५ देशातील बृहन महाराष्ट्र मंडळे… २५ राज्ये… १५०+ संस्था… ५००+ वाचनालये…
४००+ शाळा... १२००+ महाविद्यालये सहभागी होणार आहेत.
ऑनलाईन नि:शुल्क प्रतिनिधी नोंदणी | प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र मिळणार.
हे विश्व मराठी संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन झाले आहे. तरीही संमेलनातील सर्व कार्यक्रम आपल्या सवडीनुसार, आवडीनुसार कधीही पाहता येणार आहेत. खालील दिवसांच्या लिंक्स क्लिक करुन संमेलन नक्की पहावे आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईंकामध्ये सुद्धा शेअर करावे ही विनंती.
पहिले विश्व मराठी संमेलन (ऑनलाइन)
१२ कोटी मराठी बांधवांच्या वैश्विक कुटुंबात सहभागी व्हा… ऑनलाईन सभासद व्हा ..
संवाद साधा ◊ संधी मिळवा ◊ प्रगती करा ◊ समृद्ध बना ◊ संपन्न बना
असंख्य संधी ∙ वैश्विक व्यासपीठ ∙ मुक्त संवाद ∙ तंत्रस्नेही ∙ युवकांना संधी

प्रयोजन अर्थात आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन (ऑनलाईन) आयोजित करण्यामागचा उद्देश...
स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. मात्र महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकापासूनचा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आद्य दैवते आहेत. भारतीय व्यक्ती, हिंदू व्यक्ती राजा बनू शकते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या असिम कर्तुत्वाने सिद्ध करून दाखवले. इ.स.च्या १८व्या शतकावर मराठ्यांचेच राज्य होते आणि जवळपास संपूर्ण भारतात मराठ्यांचेच वर्चस्व होते. दिल्लीचा मुघल बादशहा नामधारी होता. दुसर्या बाजीराव पेशव्यांचा इ.स. १८१८ मध्ये पराभव केला तेंव्हाच खर्या अर्थाने भारतावर आपले राज्य स्थापन झाले अशी इंग्रजांची खात्री झाली. इंग्रजांनी भारत जो ताब्यात घेतला तो मराठ्यांकडून. स्वपराक्रमाने, स्वकर्तृत्वाने मराठ्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला होता. पाश्चात्य इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, हनिबाल, ज्युलियस सीझर, सर्टोरियस, नेपोलियन इ. जगप्रसिद्ध सम्राटांसोबत केलेली आहे.
मात्र १८१८ ते १९६० या काळामध्ये बरीच उलथापालथ झाली. इंग्रजांचे राज्य होते. त्यांना सर्वात ज्यास्त प्रतिकार मराठी माणसांनीच केला. मग ते १८५७चे स्वातंत्रयुद्ध असो की चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांचा लढा असो, स्वा. सावरकर यांचा क्रांतिकारी मार्ग असो कि सत्याग्रहाची चळवळ असो. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इ.स. १९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्य़ात मराठी माणसांचाच पुढाकार होता आणि नेतृत्व होते. अर्थात देशातील इतर प्रांतातील बांधवही यामध्ये सहभागी झाले होते. म. गांधी, सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव सहभागी झाले होते. जेंव्हा भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले, तेंव्हा केंद्रीय नेतृत्वामध्ये मराठी माणसाला दुय्यम स्थान दिले गेले. कारण नसताना कर्तृत्ववान मराठी माणसांची अवहेलना केली गेली. अर्थमंत्री धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण अशा कितीतरी अभूतपूर्व क्षमता असणाऱ्या व्यक्तिंना त्यांच्या वकुबाप्रमाणे न्याय मिळाला नाही. त्यांचा सातत्याने दुस्वास केला गेला. मराठी माणसाच्या हक्काची मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करावी लागली आणि त्यासाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान करावे लागले हा इतिहास आहे.
मराठी माणूस हा काटक, पराक्रमी, धाडसी, हरहुन्नरी आहे, निस्वार्थी, कमालीचा सोशिक आणि सहनशील आहे. कदाचित जरा जास्तच सोशिक आहे. त्याचा परिणाम म्हणजे तो इतरांचाच जास्त विचार करतो. त्याचे नेहमीचे उदाहरण म्हणजे इतर भाषिक बांधवांबरोबर बोलताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून तोच मराठी ऐवजी त्यांच्या किंवा हिंदी भाषेत बोलायला सुरवात करतो. मराठी माणसांमध्ये अनेक दोष आणि अवगुण आहेत हेही मान्य केले पाहिजे. मात्र सातत्याने मराठी माणसाने दुय्यम भूमिका स्वीकारायची हे आता थांबले पाहिजे. चित्रपट असो वा खेळ, मराठी माणसांनी कायम सहाय्यक किंवा दुय्यम दर्जाची भूमिका असणारी कामे करणे आता थांबविले पाहिजे. मराठी माणसाकडे कुत्सित नजरेने कुणी पाहता कामा नये. मराठी माणूस हलक्या दर्जाचा आहे, आळशी आहे, दुर्गुणी आहे असे कुणीही म्हणता कामा नये.यासाठी मराठी माणसांनी आता सिंहावलोकन करावयची गरज आहे. फक्त इतरांना दोष देऊन, टीका करून, त्रागा करून, इतरांचे आणि आपल्याच बांधवांचे वाभाडे काढून चालणार नाही. आपले गुण आणि दोष यांचा अभ्यास केला पाहिजे. आपली दुर्बल स्थाने शोधून काढून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. आपले सामर्थ्य विकसित केले पाहिजे. आज जगभरामध्ये सुमारे ६० हून अधिक देशांत सुमारे एक कोटी मराठी बांधव राहत आहेत. त्यांनी स्व-प्रयत्नाने, अविरत कष्टाने, हिंम्मतीने, साहसाने फार मोठी प्रगती केली आहे. महाराष्ट्राबाहेर देशातील इतर राज्यातही सुमारे अडीच कोटी मराठी बांधव आहेत. महाराष्ट्राची लोकसंस्ख्या बारा कोटी आहे. या साडे पंधरा कोटी मराठी बांधवांपैकी किमान १२ कोटी बांधवांची मातृभाषा मराठी आहे. या १२ कोटी मराठी बांधवांनी एकमेकांना सहकार्य करून सक्षम, संपन्न आणि समृद्ध असा वैश्विक मराठी समाज निर्माण केला पाहिजे. आम्ही प्रथम शंभर टक्के भारतीय आहोत. मात्र नंतर मराठी आहोत अशी आमची भूमिका आहे. आपले कोणाशीही भांडण नाही, कोणाविषयी तक्रार नाही. भूतकाळाबद्दल आम्हाला निरर्थक वाद घालायचे नाहीत. आपल्या चुका सुधारून आम्हाला उज्ज्वल भविष्यकाळ घडवायचा आहे यासाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे.
आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि संवाद साधने यांचा अतिशय चतुराईने आणि परिणामकारक वापर करून मराठी माणसाचा विकास करायचा अशी विश्व मराठी परिषदेची मूलभूत संकल्पना आहे. त्याचा मुख्य उद्धेश एकमेकांच्या मदतीने असा जागतिक मराठी समाज घडवायचा की मराठी माणसाला सर्वत्र सन्मान मिळेल, मान्यता मिळेल, त्याची प्रगती होईल. विशेषत: तो आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि समृद्ध होईल. त्याच्यातील आत्मविश्वास वाढेल. तो समर्थ होईल. २१ व्या शतकातील शिवबांचे मावळे म्हणून तो जगभर पराक्रम गाजवील. यासाठी साहित्य, संस्कृती आणि उद्योजकता या तीन आयमांना केंद्रस्थानी ठेवून पहिले विश्व मराठी परिषद, “विश्व मराठी संमेलन” ऑनलाईन आयोजित करीत आहे. सामर्थ्यवान मराठी माणूस घडवण्यासाठी आपल्या सर्वांकडून फार मोठे बळ मिळेल, असा विश्व मराठी परिषदेला विश्वास वाटतो.


विश्व मराठी परिषदेबद्दल थोडक्यात...
-
कोट्यावधी मराठी भाषिक बांधवांचे ऑनलाईन व्यासपीठ
-
साहित्य... संस्कृती... उद्योजकता... विषयक विविध प्रकारचे उपक्रम
-
आपले साहित्य, संकल्पना, वस्तू, उपक्रम, उद्योग... जगभर पोहोचवा
-
संमेलने, कार्यशाळा, महोत्सव, अभ्यासक्रम इ. नाविण्यपूर्ण उपक्रम
-
प्रगती करा... नेटवर्कींग करा... नेतृत्त्व करा... समृद्ध बना... संपन्न बना.
अधिक जाणून घ्या
विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद व्हा.
एकदाच भरावयाची नाममात्र वर्गणी फक्त रु. ८००/-
