top of page

विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २०२१
विनम्र आवाहन - संमेलनासाठी आर्थिक सहयोग देण्याची विनंती

Denagi

ऐच्छिक सहयोग

विश्व मराठी परिषदेने २८, २९, ३०, ३१ जानेवारी २०२१ दरम्यान मध्ये ४ दिवसांचे ऑनलाईन विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे. हे संमेलन सर्वांसाठी पूर्णत: निःशुल्क आहे. १२ कोटी मराठी भाषिकांचे वैश्विक स्तरावर असे संमेलन कदाचित प्रथमच होत आहे. प्रत्येक सहभागी व्यक्तिला  ई- प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  या संमेलनामध्ये ३५ देशातील महाराष्ट्र मंडळे, बी एम एम ऑफ अमेरिका, छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार, बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली, भरत नाट्य संशोधन मंदिर इ. अनेक मान्यवर संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच देशभरातील १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालये सहभागी होत आहेत. खऱ्या अर्थाने हे एक वैश्विक महासंमेलन होत आहे.

विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१ हा संपूर्ण उपक्रम पूर्णत: लोकाश्रयावर आयोजित केला जात आहे. संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सरकारकडून कोणतीही मदत घेतली जाणार नाही. देश विदेशातील आपल्यासारख्या मराठी भाषिक बांधवांच्या सहयोगाने हे संमेलन यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.  लोकाश्रयावर संपन्न होणारे असे हे वैश्विक संमेलन आहे. संमेलन जरी ऑनलाईन होणार असले तरी ते भव्य स्वरूपामध्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपन्न होत आहे. संमेलनासाठी सुमारे ९० लाख रुपये इतका खर्च येईल असा अंदाज आहे.

प्रत्येक मराठी भाषिक बांधवाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून संमेलनासाठी आर्थिक सहयोग करावा आणि या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने आम्ही करित आहोत. किमान रू. १००/- ( रुपये शंभर फक्त ) आणि त्याच्या पटीमध्ये आर्थिक सहयोग करावा अशी नम्र विनंती आहे. ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी  सन्माननीय सहयोग करावा ही विनंती.

 

आपले संमेलनासाठीचे आर्थिक सहयोग योगदान कृपया खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन जमा करावे.

भारताबाहेरील विविध देशातील मराठी बांधवांना विनम्र आवाहन

 

एकाच वेळी एका भाषेतील जगातील सर्व लोक एकाच व्यासपीठावर अशी घटना विश्व मराठी संमेलन २०२१ ऑनलाईनच्या निमित्ताने कदाचित जगातील कोणत्याही भाषेच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. सक्षम मराठी भाषिक समाज हा एक वैश्विक ब्रॅंड बनावा म्हणून विश्व मराठी परिषद प्रयत्नशील आहे.

 

भारताबाहेरील मराठी भाषिक बांधवांनी किमान US $ 10 एवढा आर्थिक सहयोग करावा अशी विनंती आहे. ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी  सन्माननीय सहयोग करावा ही विनंती.

 

भारताबाहेरील बांधवांना PayPal वरून जमा करता येईल. त्यासाठी कृपया खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन आर्थिक सहयोग जमा करावा अशी नम्र विनंती आहे.

bottom of page