वैश्विक प्रतिभा संगम

आपली कला... आपली प्रतिभा...आपली निर्मिती...आपली क्षितिजे विस्तारा...

नेटवर्कींग करा... संधी मिळवा... समृद्ध व्हा... संपन्न व्हा... यशस्वी व्हा...!!

माहितीचे आदान प्रदान, वैश्विक ओळख आणि निर्मितीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.

कुणासाठी ?

लेखक, कवी, अनुवादक, ब्लॉगर, बालसाहित्यिक, प्रकाशक, संपादक, पत्रकार, शाहिर, वक्ता, गझलकार, चारोळीकार, कॉपीरायटर, चित्रकार, डिझायनर, मूर्तिकार, शिल्पकार, कारागिर, माहितीपट, निर्माते, यु-ट्युबर, एकपात्री, कलाकार, सूत्रसंचालक, नकलाकार, जादूगार, एकाकींकाकार, समाजसेवक, गायक, संगीतकार, भारुड, गायक, भजनी मंडळ, वाद्य-वादक, नृत्यांगना, अभिनेता, तुंबडी-वादक, ढोल-पथके, किर्तनकार, प्रवचनकार, ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ, पुरोहित, (धार्मिक विधी), देवाचे गोंधळी, वाघ्या-मुरळी, लावणी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्रांचे खेळ, संबळ- वादक, खडी-गम्मत, दंढार, पालखीवाले, दशावतार, जाखडी, कलाकार, भोंडला कलाकार, वासुदेव, पिंगळा, नंदीबैलवाले, स्टार्ट अप, लघु-उद्योजक, महिला बचतगट, उत्पादक, हस्तकला, देवस्थाने आणि मंदिरे, सामाजिक संस्था, गणेशोस्तव मंडळे, व्याख्यानमाला, वस्तू संग्राहक, पुरस्कार प्रदाते, शाळा महाविद्यालये, वाचनालये इ. सर्वांना नेटवर्कींगची संधी.

या उपक्रमातून जगभरातील मराठी भाषिक त्यांच्याशी थेट जोडले जातील. 

कला, प्रतिभा, कौशल्ये माहितीची देवाणघेवाण... तुम्हाला पोहोचवणार जगाच्या नकाशावर !

आता लावा झेंडे अटकेपार ! देश विदेशात !!

विशेष भेट : या उपक्रमासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला स्टोरीटेल ऑडिओबुक अ‍ॅप चे १ महिन्याचे सदसत्त्व मोफत मिळणार आहे. ही भेट नोंदणी केल्यावर आपल्या ईमेलवर पाठवली जाईल.

"वैश्विक प्रतिभा संगम" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे  सहभागार्थ नोंदणी फक्त रु. ९९९/- एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी - US$ 21)

सुचना आणि नियम

 • या उपक्रमामध्ये आपली / आपल्या संस्थेची / आपल्या कंपनीची माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. तसेच विश्व मराठी परिषदेच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध होईल.

 • यासाठी आपल्याला आपल्या माहितीचा फ्लायर फक्त JPG फाईल - लांबी 1000 x उंची 600 Pixels या आकारात ईमेलवर पाठवायचा आहे. याचबरोबर आपली / संस्थेची माहिती २ ओळीत सारांश आणि १५ ते २० ओळीत विस्तृतमध्ये मराठी युनिकोड फॉंटमध्ये ईमेलमध्येच पाठवायची आहे. PDF पाठवू नये. 

 • उदा. सोबत दिलेल्या विश्व मराठी परिषदेच्या माहितीप्रमाणे आपली माहिती दिसेल. फोटो किंवा बटणावर क्लिक केल्यावर विस्तृत माहिती पेज वर जाईल.

Vishwa MArathi Parishad.jpg

विश्व मराठी परिषदेशी जोडून घ्या. मायमराठीच्या सेवेबरोबरच

आपल्या क्षमता विकसित करा.

संवाद साधा, संधी मिळवा, प्रगती करा, समृद्ध व्हा...

अधिक जाणून घ्या
 • शुल्कासहित नोंदणी करुन आपली माहिती ०५ डिसेंबर २०२० पर्यंत ईमेलवर पाठवायची आहे.

 • आपली माहिती १ जानेवारी २०२१ पासून संकेतस्थळावर उपक्रम या पेज अंतर्गत - वैश्विक प्रतिमा संगम या पेजवर प्रसिद्ध होईल. संमेलन संपल्यानंतरही ६ महिने संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

 • विस्तृत माहिती देते वेळी आपले संकेतस्थळ असल्यास द्यावे किंवा संपर्क क्रमांक द्यावा. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. 

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपली माहिती वरील दिलेल्या सुचनांप्रमाणे vms@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. थोडक्यात माहिती आणि विस्तृत माहितीचा मजकूर ईमेलमध्येच युनिकोड Text पाठवावा. चित्राची JPG Image File अ‍ॅटॅच करावी. सुचना पूर्ण वाचाव्यात आणि सर्व माहिती एकत्रच पाठवावी. एकदा प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये पुन्हा बदल केले जाणार नाहीत.

 • ऑनलाइन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच आपली माहिती पाठवायची आहे.

 • वैश्विक प्रतिभा संगम उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण 

विदेशातील बांधवांसाठी US$ 21 सहभागार्थ नोंदणी आहे. येथे क्लिक करा आणि PayPal द्वारे भरा