शेतकरी कट्टा

संमेलनामध्ये शेतकऱ्यांना मनोगत मांडण्याची संधी

या उपक्रमामध्ये शेतकरी बांधवांचे मनोगत, अनुभव, यशोगाथा, शेतीतील प्रयोग, प्रक्रिया उद्योग, नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेतीचे फायदे, जोडधंदे आणि शेतीतील भविष्याचा वेध याविषयी व्यक्त होण्याची संधी प्राप्त होत आहे.
केवळ शेतकरीच नव्हे तर शेत मजूर, अल्पभूधारक, कृषि आधारित उद्योजक, महिला बचतगट इत्यादी सर्व आपले म्हणणे मांडू शकतात.
तुमचे मनोगत सादर करा आणि देश विदेशातील १० लाख मराठी बांधवांना थेट जोडले जा.. स्वतःला एक संधी द्या...

महत्वाचे म्हणजे प्रत्येक सादरकर्त्या व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

विशेष भेट : या उपक्रमासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला स्टोरीटेल ऑडिओबुक अ‍ॅप चे १ महिन्याचे सदसत्त्व मोफत मिळणार आहे. ही भेट नोंदणी केल्यावर आपल्या ईमेलवर पाठवली जाईल.

"शेतकरी कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी निशुल्क आहे.

सुचना आणि नियम

 • आपली कला सादर करण्यासाठी ८  ते १०  मिनिटाचा कालावधी आहे.

 • आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनादरम्यान विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युबवर चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.

 

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटिंग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटिंग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटिंग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाइलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत:चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • सादरीकरण वाचून दाखवू नये. सराव करुन व्हिडिओ बनवावा. अडखळल्यास पुन्हा रेकॉर्ड करावे. 

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. या पेजच्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे.

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटिंग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे.

 • सादरीकरणाच्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करायची आहे. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील संस्कार-संस्कृती कट्टा या उपक्रमामध्ये <कलेचे नाव उदा. गीत> सादर करीत आहे."

 • सादरीकरण निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ईमेल द्वारे करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही.

 • आपला रेकॉर्डेड व्हिडिओ upakram@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेलमध्ये आपली माहिती  (नाव, मोबाइल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहर/गावाचे नाव) मराठीमध्ये पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्स ची साइझ मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साइझ कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.
 • शेतकरी  कट्टा उपक्रमासाठी नोंदणी निशुल्क आहे.

नमुना व्हिडिओ

Sample Video

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

 • White Facebook Icon
 • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org