आयडीया कट्टा

नाविन्यपूर्ण कल्पनांचे वैश्विक व्यासपीठ

कल्पना करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे ही वेगळी गोष्ट आहे. कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि सृजनशीलता हे मानवाला मिळालेले वरदान आहे. “A single idea can change the world” हे वाक्य सुपरिचित आहेच. परंतु, अनेकदा कल्पनांचा जन्म होण्यापूर्वीच त्या मरताना आपण पाहतो. विविध प्रकारच्या क्रांतिकारी, उद्योजकीय, आसपासची परिस्थिती बदलू शकणाऱ्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने “आयडीया कट्टा” हा अभिनव उपक्रम विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २०२१ मध्ये आयोजित केला आहे.
या उपक्रमात सादर केलेल्या आयडीया आणि त्या आयडीयांचे सादरकर्ते जगभरातील मराठी बांधवांशी थेट जोडले जात आहेत. या उपक्रमाद्वारे आपल्या अभिनव कल्पनांचे सादरीकरण करून विविध प्रकारची माध्यमे, संसाधने उपलब्ध ज़ाली आहेत. अर्थसहाय्य, भांडवल पुरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे.
अत्यंत कमी वेळेत आपली संकल्पना सादर करणे हे खरे आव्हान आहे. तेच भविष्यातील यशाचे इंगितही आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नव्हती. विषयाचे कोणतेही बंधन नाही. साहित्य, संस्कृती, उद्योजकता, समाजसेवा, राजकारण, माध्यमे, शेती अर्थव्यवस्था, सेवा, उद्योग इत्यादी अनेक विषयावरील कल्पनांचे सादरीकरणे आहेत.

अनेक नवनवीन आलेल्या कल्पनांमधील काही निवडक कल्पनांचे सादरीकरण खास तुमच्यासाठी.

(२८ जानेवारी २०२१ पासून व्हिडीओ प्रसारी होतील.)

प्लेट शेअरिंग

विद्या अनंतवार

विज वाचवा, पर्यावरण जगवा

चंद्रकांत ठाकूर

गुणीसोबत शिकूया

प्रज्ञा वझे - घारपुरे

पौरोहित्य

श्रेयस श्रीनिवास मांडवगणे

चला विज वाचवुया

निता पटवर्धन

आयडिया

मधुरता देशमुख

प्लॅस्टिक पुर्नवापर

राजलक्ष्मी कदम

स्पेस मॅजिका

स्पेस मॅजिक

स्टेनप्लेस बॅंक

स्टेम्प्लस क्रायोप्रिझर्वेटिव्ह प्रा. लि.

कार्यसुधार

अशोक फ़डके

माझी समाजसेवा

कविता पाटणकर

शेल्टर

अविनाश कवठेकर

पुण्यातील सार्वजनिक वाहतुक

राजेंद्र साळुंखे

स्मार्ट लिगसी

ज्योत्सना नाईक

आयडिया

विनायक ढवळे

शोभेच्या झाडांची लागवड

मिलिंद जोशी