सांगेन गोष्टी युक्तिच्या चार (वडीलधारी कट्टा)
ज्येष्ठ व्यक्तिंचे मनोगत - अनुभवाचे बोल - तरुणांसाठी नवी दिशा
माणसाच्या वयाबरोबर अनुभव आणि शहाणपण यामध्ये वाढ होत असते म्हणून ज्याने जास्त पावसाळे पाहिले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार आदर आणि सन्मान देण्याची परंपरा आहे. आजच्या गतिमान जीवनपद्धतीमध्ये अनेकदा वडीलधाऱ्या व्यक्तिंबरोबर मुक्त संवाद साधायला वेळ मिळत नाही. विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २०२१ मध्ये एक अभिनव उपक्रम सुरु केला , "सांगेन गोष्टी युक्तिच्या चार".
वडीलधाऱ्यांचे अनुभव, मनोगत, उपदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहचावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
व्यस्ततेमुळे किंवा उपदेश ऐकून घेण्याची अनास्था निर्माण झाल्यामुळे अनेकदा दुर्दैवाने तरुण पिढीपुढे मन मोकळे करणे, मार्गदर्शन करणे वडीलधाऱ्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनातील विचारांना मोकळी वाट करून देण्याच्या इच्छेला व्यासपीठ मिळाले आणि तरुण पिढीला मोलाचे मार्गदर्शन सहजपणे उपलब्ध झाले.
महाराष्ट्राच्या खेड्यात राहणाऱ्या एखाद्या आजीपासून ते परदेशात वास्तव्य असलेले ज्येष्ठ आजोबा अशा आलेल्या असंख्य मोलाच्या मनोगतातील काही निवडक अनुभवाचे बोल तुमच्यासमोर.
(२८ जानेवारी २०२१ पासून मनोगते प्रसारीत होतील.)