"पुलं"च्या व्यक्ती वल्ली आणि गणगोत

"पुलं",प्रा लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री नंतर त्यांचे शिष्य प्रभाकर निलेगांवकर यांचा पुलंच्या ४ वल्ली(पूर्णतया)सादर करणारा, व्यावसायिक रंगभूमीवरील वाङमयीन, दर्जेदार विनोदी एकपात्री प्रयोग

"पुलं"च्या व्यक्ती वल्ली आणि गणगोत

"पुलं"च्या व्यक्ती वल्ली आणि गणगोत-  हा माझा धम्माल विनोदी दोन अंकी एकपात्री प्रयोग आहे.पुलंच्या लिखित/कथित (ऑडिओ कॅसेट मधील )हरितात्या,पेस्तनजी,अंतु बर्वा व रावसाहेब या अजरामर वल्ली, संपुर्णतया व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम सादर करणारा भाग्यवान.


१) हरितात्या हे पुलंचं बालपण आठवून देणारं भाबडं पात्र डोळ्यांत पाणी उभे करतं.

२)पेस्तनजी- यामधे पुलं, सुनीताबाई, पारशी,त्याची बायको व्यक्तिरेखा असून , पुलंनी गायलेला अभंग मी मुर्छना प्रकारात (भूप,जोगीया,भीमपलास)सादर करतो.

३)अंतु बर्वा-- कोकणातील इरसाल पात्र, विनोद आणि कारूण्य यांचं अप्रतीम मिश्रण,त्यांची Exit मनाला चटका लावते.

4)रावसाहेब-कर्नाटकांतील वेधक, विनोदाचा षट्कार ठोकणारं पात्र,मराठी साहित्यातील लखलखता हिरा आहे.हा प्रयोग एक दर्जेदार अनुभूती आहे.याचं दिग्दर्शन नटश्रेष्ठ श्रीकांत मोघेंनी केलं आहे. 


याशिवाय माझा , अस्सल माणसं इरसाल नमुने हा 48 भन्नाट विनोदी एकपात्री (२२९०प्रयोग) व हसरी संध्याकाळ हा सर्वांना आवडणारा ( विशेषत: ज्येष्ठांना) दीड तासाचा व्याख्यानाचा कार्यक्रम मी सादर करतो. त्याची माहिती या उपक्रमातील संकेतस्थळावर आपण पाहू शकता.माझे सर्व कार्यक्रम आपल्या बजेटमध्ये (अटी लागू)आहेत.ही माझं व्यावसायिक रंगभूमीवरील केशराची शेती आहे.सुगंध घेणं आपल्या हाती.

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


आपला विनीत 

प्रभाकर निलेगांवकर पुणे-

M 9423349897

pe.nilegaonkar@gmail.com

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org