अत्रेय इनोवेशनस् प्रायवेट लिमिटेड

अत्रेय इनोवेशनस् प्रायवेट लिमिटेड (पुणे) स्टार्ट-अप कंपनीने आयुर्वेदिय नाडी परीक्षणाला संगणकीय आणि मॉडर्न डेटा सायन्सची जोड देऊन हेल्थ मॉनिटर विकसित केले आहे. वेलनेस इंडस्ट्री साठी ही एक क्रांती ठरेल.

अत्रेय इनोवेशनस् प्रायवेट लिमिटेड

तुर्या : आयुर्वेदीय नाडी परीक्षा घरच्या घरी
-------------------------------------------
आरोग्य कशाला म्हणावे? माझे शरीर तंदुरुस्त आहे पण मनाने मी चिंताग्रस्त आहे, तर याला आरोग्य म्हणावे का? आयुर्वेद शास्त्रानुसार शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन म्हणजे आरोग्य. अजून थोडे सोपे सांगायचे तर, जेव्हा पोट व मन हे दोन्ही शांत असतात तेव्हाच दीर्घायुष्य व सुखी जीवन लाभते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्क्रीन टाइमचा अतिरेक आणि झोपेची कमतरता यामुळे व्याधीग्रस्त होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. ह्या क्षणाला तर कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग आणि आपले स्वतःचे विश्व देखील अधिक गुंतागुंतीचे झालेले आहे, ज्यामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित होते. पण प्रश्न असे आहेत की, हे कसे समजणार? आपल्यात किती असंतुलन आहे? आणि ते कसे काय दूर करायचे ?

त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत... तुर्या.
तुर्या म्हणजे आयुर्वेद, न्यूट्रिशन सायन्स आणि डेटा सायन्स या तीन शास्त्रांना एकत्र घेऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य निरीक्षण करणारे पेटंटेड साधन. जसे घरामध्ये बीपी मशीन असते, ऑक्सिमिटर असते तसेच तुर्या. तुर्या, हे घरी आयुर्वेदिक पद्धतीने नाडी परीक्षण करून, त्यानुसार आपली प्रकृति, रोजची विकृती, राहायचे ठिकाण आणि हवामान यांचा एकत्रित विचार करून आपल्याला योग्य आहार, विहार, व्यायाम व योग यांचे मार्गदर्शन करते. याचा उपयोग वाढलेले वजन, अ‍ॅसिडिटी, मानसिक ताण, असंतुलित रोग प्रतिकारशक्ती नियंत्रणात ठेवायला होतो. तुर्या अँपच्या मदतीने तुम्ही पुढे जाऊन घरातूनच आयुर्वेदीय वैद्य, योग अभ्यासक व नुट्रीशन तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

तुर्याचे हॉर्डवेअर श्री. सतीश गोखले या नामांकित प्रॉडक्ट डिजायनर ह्यांनी तयार केले आहे,  ज्यांनी १०० हून अधिक प्रॉडक्टस् बनवली आहेत, टाटा-स्वच्छच्या डिझाईनसाठी त्यांचे नाव विशेष घेतले जाते. तुर्याचे सॉफ्टवेअर हिपा स्टँडर्ड (प्रमाणित) ने सुरक्षित आहे.

भारताने जगाला योगाभ्यास शिकवला. आता पुढचे पाऊल हे आयुर्वेदाचे आहे. मराठी शास्त्रज्ञ व फस्ट जनरेशन उद्योजक डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या आयआयटी बॉम्बेच्या पीएचडी थेसिसवर आधारित, भारतीय आरोग्य विज्ञानवर आधारित (आत्मनिर्भर भारत), संपूर्ण जगासाठी तुर्या हे मेक इन इंडिया प्रॉडक्ट विकसित केले आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या टेक्नॉलॉजीला पुरस्कार दिला आहे. 

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळावर भेट द्या: 

www.turyaa.tech

आपण आपल्या कुटुंबासाठी व प्रियजनांसाठी आजच तुर्या बुक करा, किंमत केवळ ₹१७५००/-. 

या संमेलनासाठी खास ऑफर: आजीवन सभासदत्व !! 

इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड ने देखील तुम्ही पैसे भरू शकता.


Email: aniruddha@atreyainnovations.com

Mo: Aniruddha Joshi - 9881472945

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org