
अस्सल माणसं इरसाल नमुने
प्रभाकर निलेगावकर यांचा धम्माल विनोदी एकपात्री प्रयोग । "पुलं",प्रा लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्रीनंतर त्यांचे शिष्य प्रभाकर निलेगांवकर यांंचा गेली ३० वर्षे देशविदेशात खळखळून हसविणाारा दर्जेदार, वाङमयीन एकपात्री(२२९०प्रयोग)

"अस्सल माणसं इरसाल नमुने" हा माझा दोन अंकी धमाल एकपात्री प्रयोग आहे. ही माझी, माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांची कथा आहे, जी प्रयोगात तुमची होते. मुलें, मुली, सुशिक्षित आणि ग्रामीण स्त्रीया, पत्रकार, गाणारे बुवा, पारशी, आई, बहीण, मोलकरीण ३ शिक्षक, इरसाल म्हातारे, वृध्द स्त्रीया व सूत्रधार. इ. ४८ भन्नाट व्यक्तीरेखा मी सादर करतो. महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहात माझे व्यावसायिक प्रयोग होतात. गुरवबुवा सादरीकरणांतील गाणं पं. भीमसेन जोशींची आठवण करुन देते. अ. भा. नाटयपरिषद मुंबई सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कार, मराठवाडा रत्न पुरस्कार, रोटरी. 2000मिले अवार्ड, महाराष्ट्र राज्य गॅझेट,सरस्वती पुरस्कार (कर्नाटक) इ १४ पुरस्काराने मी सन्मानित असून दिलीप प्रभावळकर,वामन केंद्रे, द. मा. मिरासदार मा.राज्यपाल राम नाईक, शिवराज पाटील चाकूरकर, देवेन वर्मा गोपिनाथ मुंडे इ.मान्यवरांनी, सत्कार केला आहे. लोकसत्ता,महा टाइम्स,सकाळ इ अनेक वृत्तपत्रांनी माझी नोंद घेतली आहे व घेत आहेत. १५ नाटकात मी प्रमुख भूमिका केलेल्या असून "पुलं"च्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत" धमाल एकपात्री व "हसरी संध्याकाळ"हे हसवीत, प्रबोधनपर व्याख्यान मी सादर करतो. त्यांची माहिती या उपक्रमातील इतर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माझे एकपात्रीं आपल्या बजेटमध्ये (अटी लागू) आहेत. ही माझी रंगभूमीवरील केशराची शेती आहे. सुगंध घेणं आपल्या हाती. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला .
प्रभाकर निलेगांवकर पुणे.
(मो. 9423349897)
Email : pe.nilegaonkar@gmail.com