
नारायण दत्तात्रय कुडलीकर
लेखक: " प्रकाशाच्या वाटेवर..."

ग्रामीण गावगाड्याचा पहिला रंग, विद्युत क्षेत्रातील चाळीस वर्षे अनुभवाचा दुसरा रंग आणि कौटुंबिक संघर्षाचा तिसरा रंग असे हे " प्रकाशाच्या वाटेवरील..." तिरंगी आत्मचरित्र साध्या, सोप्या, प्रवाही भाषेमुळे खिळवून ठेवणारे आणि प्रेरणादायी आहे.
प्रकाशदाता सूर्याला सूर्य नारायण असेही संबोधले जाते. योगायोगाने नारायण कुडलीकरांनी प्रकाशदानाचे काम करणार्या विद्युत मंडळातच नोकरी केली. अशा या ‘प्रकाशदानी’ माणसाने अतिशय प्रामाणिकपणे आपल्या आयुष्याचे रेखाटलेले शब्दचित्र म्हणजेच हे पुस्तक ‘प्रकाशाच्या वाटेवर....."
संपूर्ण पुस्तकभर ग्रामीण जनजीवन आणि विद्युत मंडळातील अनुभव रेखाटताना कौटूंबिक पार्श्वभूमीचा मोठा कॅनव्हास लेखकाने कुशलतेने वापरला आहे. गावाकडचे अनुभव, शेती करणार्या भावाच्या शेतीच्या समस्या ,या जोडीलाच शिक्षणातील अडचणी, कुटूंबातील मुलाचे,पत्नीचे दुखणे,आजारपण हे सगळं सहजपणे समांतरपणे येत जातं.
एक सामान्य माणूस संघर्षातून पुढे जात रहातो. त्यासाठी कसलीही कृत्रिम भाषा न वापरता साधेपणाने आपला अनुभव मांडत जातो. यातील उत्कटता आपल्याला सहज जाणवते.
कुडलीकरांची भाषा सोपी ,सरळ आहे. शाब्दिक गुंतागुंत करून काही मांडणं हा त्यांचा पिंड नाही. शब्दांचा फुलोराही फारसा आढळून येत नाही. हे लिखाण सहज साधेपणाने वाचकांना खिळवून ठेवते. हेच या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
" प्रकाशाच्या वाटेवर..." हे पुस्तक Book Ganga च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे..
पानें- २७८ . छापील किंमत- रुपये 300/-
लेखक नारायण दत्तात्रय कुडलीकर यांचा व्हाट्सअप नंबर 8805859389.
Email:- ndkudlikar04@gmail.com
प्रकाशक:- जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबाद.