
मालविका यशवंत देखणे
लेखिका
परिचय
नाव - मालविका यशवंत देखणे
जन्म - १९६१
शिक्षण - एम. एस. सी. ( फूड अँड न्युट्रीशन) बी. एड.
पत्ता - गणराज ब्लॉक- आय / प्लॉट १, लक्ष्मिनगर, नागपूर ४४००२२
संपर्क - 0712-2220234 , Mob- 9860440015
ई मेल- maladekhane@gmail.com
व्यवसाय- लेखिका
लेखन- मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत विविध प्रकारचे लेखन. प्रथितयश
मासिकांत आणि दैनिकांत ३५०+ कथा आणि लेख प्रसिद्ध. ( स्त्री,
माहेर, मेनका, जत्रा, धनंजय, अमृत, सकाळ साप्ताहिक, लोकप्रभा,
विविध दिवाळी अंक,तरुण भारत, लोकसत्ता, Femina, Woman’s
Era, Hitavada, Science Reporter, इत्यादी).
३५+ पुस्तके प्रकाशित. बाल-कुमार साहित्य लिहिण्याची विशेष
आवड. कादंबरिका, कथा, ( संस्कार कथा, साहस कथा,इत्यादी) ,
विज्ञान आणि पर्यावरण-विषयक साहित्य लिहिण्यात विशेष रुचि.
मुलांमध्ये संस्कार, साहस रुजवणे, विज्ञान आणि पर्यावरण-विषयक
जागृती करणे ह्या उद्देशाने लेखन.
पहिले पुस्तक- चिंटू हरवला आणि इतर गोष्टी- महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून प्रसिद्ध.
विशेष पुरस्कार-
पर्यावरण कथा पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार (२०१०) .
विदर्भ साहित्य संघ नागपूर, यांचा बालसाहित्य योगदान
पुरस्कार (२०१५).
डिटेक्टिव हर्षद (भाग१-४) संग्रहाला दाते स्मृती
संस्था वर्धा यांचा प्रभाकर श्रवणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार.
स्पर्शमणि पुस्तकाला भारत विद्यालय बुलढाणा यांचा शशिकला
आगाशे स्मृती पुरस्कार (२०१५). शैलजा काळे यांचे बालवाङमय एक
अभ्यास, पुस्तकाला आणि एक दुपार गाणारी ह्या ललित लेख संग्रहाला
अभिव्यक्ती संस्था नागपूर यांचा पुरस्कार. कथा आणि पुस्तकांना
पद्मगंधा संस्था, नागपूरचे पुरस्कार.
बालसाहित्याची ब्रेल पुस्तके आणि ऑडीओ बुक्स झाली आहेत.
आकाशवाणीवर कार्यक्रम झाले आहेत.