top of page
Vaishwik Pratibha Sangam.png

मेत्ता फौंडेशन (Metta Foundation)

मेत्ता फौंडेशन 'Metta Foundation' हि आदिवासी आणि वंचितांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासावर कार्य करणारी ठाणे, महाराष्ट्र येथील नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे.

मेत्ता फौंडेशन (Metta Foundation)

मेत्ता फौंडेशन 'Metta Foundation' हि आदिवासी आणि वंचितांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासावर कार्य करणारी ठाणे, महाराष्ट्र येथील नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे.


मेत्ता” हा एक पाली शब्द आहे ज्याचा अर्थ प्रेमळ-दयाळूपणा, मैत्री, सद्भावना, दयाळूपणा, मित्रत्व, प्रेमळपणा, सहमती, अनैतिकता आणि अहिंसा आहे.

आमचा विश्वास आहे की आदिवासी ग्रामीण शाळा किंवा कमी सुविधा असणार्‍या शाळांमधील मुलांना जर योग्य स्त्रोत आणि संधी पुरविल्या गेल्या तर ह्या मुलांचे आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुखकारक होईल. आमच्या संस्थे मार्फत आम्ही विविध योजनेद्वारे मुलांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. प्रत्येक वर्गात ग्रंथालय, शैक्षणिक शिष्यवृत्ती , बालवाडी अशा व इतर अनेक प्रकल्पाद्वारे आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देतो. आमच्या शिष्यवृत्तीने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. 'प्रत्येक वर्गात ग्रंथालय' मुळे आम्ही ७००० पेक्षा अधिक अभ्यासेत्तर पुस्तक जवळ जवळ ५० आदिवासी आणि ग्रामीण शाळांना देऊ केलीत. आमच्या बालवाडी मध्ये आलेल्या मुलांचा शालेय पाया मजबूत करून त्याना प्राथमिक शाळे मध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करण्यासाठी आमचे शिक्षक कार्यरत असतात. सेवाभावी लोकांची संस्थेला जोड असल्यामुळे आम्ही हे काम करोना च्या काळाततही सुरु ठेवू शकलो.

अधिक माहिती साठी www.mettafoundationindia.org ह्या संकेत स्थळावर भेट देणे.

किंवा ngo.mettafoundationindia@gmail.com वर संपर्क करणे.


Love n Light,

Anushka Kapse

Author|Spiritual Coach | Past Life Regression Therapist |

|Soul Realignment Practitioner | Reiki Master | Energy Healer |

http://www.eternalyou.org/

FB/eternalyou18

bottom of page