
मेधा इनामदार
विविध प्रकारच्या कथा, कविता, नाटके, लेखसंग्रह, व एकांकिका प्रसिद्ध
परिचय
मेधा इनामदार
403 अे जे अव्हॅन्यू, कमिन्स काॅलेज रोड,कर्वेनगर, पुणे 411052
फोन: 93700 63245
* शिक्षण: एम काॅम .
* नेाकरी सुरवातीला काही काळ मुंबई येथे रिझर्व बॅंक आणि सध्या ओरिअेंटल इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट मॅनेजर.
* विविध प्रकारच्या कथा, कविता, नाटके, लेखसंग्रह, व एकांकिका प्रसिद्ध
* मुलांसाठीे हिरकणी , शक्तीचे रहस्य , फटाक्याविना दिवाळी , प्रेमळ भूत या नाटकांचे पुण्यामध्ये व राज्य नाटयस्पर्धांमध्ये अनेक प्रयोग
*रविवार सकाळ आणि मुंबई चौफेर या दैनिकांसाठी, छावा, किशोर मासिकात मुलांसाठी विपुल लिखाण
* केसरीच्या विहार पुरवणीसाठी तरंग, इंद्रधनुष्य, हास्यरंग, नाती जपतांना इत्यादि सदरांसाठी गेली अनेक वर्षे नियमित सदर लेखन
* सकाळच्या मैत्रिण पुरवणीत ‘सावल्या मनातल्या ’ ‘ ती ची कथा ’ ‘जागर ’ ‘ एक नाणे दोन बाजू ’ ‘महानायिका’ ,‘ अटळ आणि अपरिहार्य ’ या सदरांसाठी साप्ताहिक लेखन .
* आकाशवाणीच्या गंमतजंमत , बालोदयान , युववाणी , आपले माजघर, शिशुविहारसाठी सर्व प्रकारचे लिखाण वेळोवेळी चालूच . लहान मुलांसाठी आणि नभोनाटय, या विभागासाठी अनेक नाटके प्रसिदध.
* बालचित्रवाणीवर काही नाटके व शैक्षणिक कार्यक्रमांचे लेखन.
* शिक्षणस्फूर्ती या शैक्षणिक मासिकामधून खास पालकांसाठी सदर
* इयत्ता पाचवीसाठी सुलभभारती या पाठयपुस्तकात प्रतिध्वनी हा पाठ .
* अनेक एकांकिका हिंदी व मराठी भाषेत प्रसिदध व सादर.
* अलुरकर कॅसेट्सच्या बालोदयान या दहा भागांच्या कॅसेट्सच्या संचामध्ये सहभाग व लेखन
* एबी आॕडिओतर्फे रामायण , महाभारत , वैज्ञानिकांच्या कथा या कॅसेट्स प्रकाशित
* उत्तम कथा, विश्रांती, सासर माहेर, प्रपंच , मानिनी , प्रतिबिंब ,छावा इत्यादि मासिंकामधून कथा आणि ललित लेख लेखन
* दिवाळी अंकांमधून लेखन चालूच.
*बालसाहित्य: बाळ शाळेत जा , छान छोटया नाटुकल्या , सत्याची शक्ती, असे होते गांधीजी, परीकथा-सोनेरी , परीकथा-चंदेरी, डायमंड किशोर कथा, वैज्ञानिकांच्या कथा, हसरे बेडुक,
ब्लॅकहोल अर्थात कृष्णविवरे , चांद्रयान 2.
* विनोदी लेखसंग्रह: हसरी उठाठेव ;
* ललित लेखसंग्र ः
मनातल्या सावल्या: ; 4 आवृत्या
आनंदाचं झाड: लेखसंग्रहः दोन आवृत्या .
मी माझयासाठी, श्रावणसरी, आरोग्यमंत्रा , वेळेचे व्यवस्थापन , अर्थ सल्ला गुंतवणूक अर्थात बजेट , आपली मुले आणि आपण
* कथासंग्रह: ज्याचा त्याचा वाटा , छेदणारी वर्तुळे, तिसरी घंटा
* कादंब-या:
* महानायिका द्रौपदीचे व्यक्तिचित्र रेखाटणारी: सीमान्त ,
* श्रीरामाचे व्यक्तिचित्र रेखाटणारी: पुरुषोत्तम ,
* चितोडच्या राणी पद्मिनीच्या जीवनावरील: महाराणी पद्मिनी
* गौतम बुद्धाच्या जीवनावरील: गौतम बुद्ध,
* स्वामी विनेकानंदांचे व्यक्तिचित्र रेखाटणारी: स्वामी विवेकांनद
* सामाजिक कादंबरी: गाळलेली जागा
* कौटिल्याीय चाणक्य यांची जीवनकहाणी: महागुरु चाणक्य : आगामी
बॅटल आॕफ जीन्स ‘ः महाकादंबरी - सायन्स फिक्शन: आगामी
पुरस्कार ः
* पुरुषोत्तम या कांदबरीला साहित्यप्रेमी मंडळातर्फे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2015
* मुंबई साहित्य संस्कृती मंडळातर्फे एकांकिका लेखनस्पर्धेत प्रथम पुरस्कार 1986
*संगम रंभभूमीतर्फे बालनाटयलेखनस्पर्धेत प्रथम पुरस्कार 2001
* अखिल भारतीय बालसाहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट बालवाड्मय पुरस्कार 2008
* काही मराठी गायक गायिकांसाठी वैयक्तिक मराठी अलबम्साठी गीतलेखन
* लहान मुलांसाठी बालगीतांची सीडी प्रकाशित
* यू ट्यूब वर फाऊंटन कॕसेटस कंपनी तर्फे अनेक बालगीते प्रसिद्ध .
ईमेल: