शिवानी भजनी मंडळ

शिवानी भजनी मंडळाची स्थापना १९८६ साली पुणे, महाराष्ट्र येथे झाली . शिवानी भजन मंडळ - हे एक आगळे-वेगळे मंडळ आहे. शिवानी भजनी मंडळाची स्थापना आमच्या सद्गुरू श्री. उषाताई (अदिती) अडसूळ ह्यांनी केली. गुरुमाऊली शिवभक्त होत्या,ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप, नामस्मरण हेच महत्वाचे, हे गुरुमाऊलींनी अनुभवातून पटवून दिले.

शिवानी भजनी मंडळ

कलीयुगा मध्ये नामसंकीर्तन, सत्संग द्वारे प्रापंचिक अडचणी दूर होतात व परमेश्वर प्राप्ती करून घेता येते.  गुरुमाऊलींनी स्वतः शिवाचे वर्णन, स्तुती करणारे अभंग, गाणी ह्याची रचना केली, ह्या अभंगांना, गाण्यांना स्वतः स्वरबद्ध हि केले. गुरमाऊलींच्या सहवासात अनेकांन मध्ये काव्य रचनेची प्रतिभा जागृत झाली. शिव भक्त स्वतः शिव स्तुती पर गीते, अभंगांची रचना करू लागले, स्वतः च्या भाषेत त्या जगत्नियंतला आपली भावना व्यक्त करतात. भजना मध्ये स्व रचित भजने आहेत जे प्रत्येकाच्या ह्रिदयाला भिडते. मंडळा मध्ये , वय वर्ष ८ ते ८२ ह्याचा सहभाग आहे.

ज्ञान युक्त भक्ती आणि भक्ती युक्त ज्ञान मिळावे म्हणून: काशीखंड, शिवलीलामृत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचे वाचन, निरूपण आणि चर्चा हि असते. गुरुमाऊलीं समवेत संपूर्ण भारत भ्रमणाचा लाभ हि मिळाला- भारताचा इतिहास, परंपरा, राहणीमान, भूलोकावरील भारत हि अध्यात्मिक राजधानी आहे हे अनुभवयास मिळाले.

कोरोना - लॉक डाउन पासून भजन, वाचन, चर्चा हे सर्व आम्ही झूम वर करत आहोत. आमच्या सत्संग,भजना मध्ये खंड पडला नाही-हाच गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे. झूम वर अनेक देशा मधून उदा: Australia, USA, Canada, France शिवभक्त येतात आणि सामुदायिक प्रार्थनेचा लाभ घेतात.


संपर्क: ७७४१०४००८८ (वासंती कुलकर्णी)

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org