
श्री. लक्ष्मण भिकाजी कोठावळे
(प्रा.आणि विभागप्रमुख=मराठी विषय
श्री ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर, अहमदनगर, महाराष्ट्र,भारत)
नाव=श्री. लक्ष्मण भिकाजी कोठावळे
(प्रा.आणि विभागप्रमुख=मराठी विषय
श्री ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर, अहमदनगर, महाराष्ट्र,भारत)
मो.=9403370956
"संत निळोबाराय महाराज"
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे निष्ठावंत शिष्य आणि थोर गुरुभक्त संत निळोबाराय महाराज यांचा जन्म श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस इ.स.१६७६ साली रामलिंग मंदिर (शिरूर) येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मुकुंदपंत मकाशीर व आईचे नाव लक्ष्मीबाई होते.लहानपनापासून त्यांना ईश्वरभक्तीची आवड होती.इ.स.१६९४ साली मैनावती या कुलशीलवान मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स.१६९५ साली त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले.निळोबाराय महाराजांना भिवबा व काशिनाथ ही दोन मुले व चंद्रभागा नावाची कन्या होती.इ.स.१७०६ साली निळोबाराय पराशरांची तपोभूमी पारनेर येथे वास्तव्यासाठी आले.इ.स.१७१०ते इ.स.१७१२अशी दोन वर्षे त्यांनी संत तुकाराम महाराजांचे चिरंजिव नारायण महाराजांबरोबर तीर्थयात्रा केली.या काळात संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांनी पाठ केले व गुरू म्हणून संत तुकाराम महाराजांचा धावा केला.गुरूच्या साक्षात्कारामुळे ते अभंग रचना व कीर्तन करू लागले.निळोबाराय महाराजांचे आजमितीला १५००अभंग उपलब्ध आहेत.माणसाने जीवनात काय करावे याविषयी ते उपदेश करतात.
"येऊनिया नरदेहा | काही स्वहित ते पहा ||१||
नाहीतरी व्यर्थ जन्म | चिंतीतसे विषय काम ||२||
पशुविषय सेवेती | तयापरी तुझी स्थिती ||३||
निळा म्हणे व्यर्थ गेला | आणि भूमीभार झाला ||४||
जगाच्या कल्याणासाठी देह झिजवून फाल्गुन वद्य द्वितीयेला (इ.स.१७५३)संत निळोबाराय महाराजांनी श्री क्षेत्र पिंपळनेर ,ता.पारनेर,जि. अहमदनगर ,राज्य महाराष्ट्र येथे संजीवन समाधी घेतली.वारकरी संत मालिकेतील संत निळोबाराय महाराज हे अखेरचे संत होऊन गेलेले आहेत.
Email: