
सद् गुरू संगीत विद्यालय, श्री. विवेक वडगबाळकर
शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीताच्या दर्जेदार कार्यक्रमाच्या शृंखलेचे सादरीकरण. व्यावसायिक कलाकारांच्या कार्यक्रमा बरोबर गुणी कलाकार व विद्यार्थ्यांसाठी मंच. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार.

संस्थेची विस्तृत माहीती
१२ वर्षापूर्वी विवेक वडगबाळकर सरांनी व अनुजा मॅडम यांनी सदगुरू संगीत विद्यालयाचे छोटेसे रोपटे लावले. आज एक तपानंतर त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. डोंबिवलीतील या संगीत विद्यालयाचा प्रमुख उद्देश संगीताचा प्रचार व प्रसार करणे हा आहे. या विद्यालयात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, सुगमसंगीत, हिंदी व मराठी सिने-संगीत याचे शिक्षण दिले जाते.
* विद्यालयातील साधकांची वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तयारी करून घेतली जाते.
* शास्त्रीय संगीताच्या परिक्षार्थींचा तबला, तंबोरा व हार्मोनियमच्या साथीने सराव करून घेतला जातो.
* प्रत्येक महिन्याला परिक्षार्थींसाठी ‘स्वरमंच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
* विद्यालयातील साधकांचा समावेश करून वर्षातून ३ ते ४ वेळा वाद्यवृंदाचे नियोजन करण्यात येते. त्यात वेगवेगळ्या ‘संगीत दिग्दर्शकांची गीते’ ही संकल्पना राबविण्यात येते.
सद् गुरू संगीत विद्यालयाच्या, स्वरमंच foundation या कार्यक्रमाच्या शृंखलेमुळे रसिक श्रोत्यांना २०१९ मध्ये सुश्राव्य शास्रीय, उपशास्रीय संगीताचा लाभ झाला.
२०१९ मध्ये अनुक्रमे पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी अश्विनी भिडे, सौ. मंजुषा पाटील आणि सद्ग गुरू संगीत विद्यालयातील गुणी कलाकारांचा वाद्यवृंद असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले.
संपर्क:
विवेक वडगबाळकर
सद् गुरू संगीत विद्यालय,स्वरमंच फाऊंडेशन, डोंबिवली
मोबाईल व व्हाट्सअप नंबर : 9820867422