
साईप एज्युकेशन
साईप एज्युकेशन ही माईंडफुलनेस म्हणजे साक्षी ध्यान आणि त्याचा उपयोग मानसोपचार म्हणून कसा करायचा हे मराठी,हिंदी मध्ये शिकवणारी एकमेव संस्था आहे.
सर्व ध्यान प्रकारांचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला. मात्र आपण त्या ध्यानाला केवळ मोक्षाचे साधन म्हणून पाहिले. आधुनिक काळात ध्यानाचे परिणाम मेंदूत आणि शरीरातील पेशीतील गुणसूत्रावर देखील होतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग शिक्षण व आरोग्यासाठी कसा करायचा हे आम्ही शिकवतो. चिंता, उदासी कमी करण्यासाठी, भावनिक बुद्धी विकसित करण्यासाठी आम्ही ऍप च्या साहाय्याने प्रशिक्षण देतो. सर्टिफिकेट इन माईंडफुलनेस थेरपी आणि सर्टिफिकेट इन आयुर्वेद सत्त्वावजय हे सहा महिन्यांचे दूरस्थ शिक्षण पद्धतीने कोर्स घेतले जातात. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ,विस्तार विभाग, नागपूर यांचे प्रमाणपत्र मिळते. डॉ यश वेलणकर हे साईप एज्युकेशन संस्थेचे संस्थापक असून त्यांच्या ध्यान विज्ञान पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानस शास्त्रातील उत्कृष्ट पुस्तकांसाठी असलेला सोनोपंत दांडेकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे दै. लोकसत्ता मधील मनोवेध सदर लोकप्रिय झाले आहे. खाली माईंडफुलनेस प्रशिक्षणासाठी उपयुक्त ऍप ची लिंक आहे. या अँड्रॉइड ऍप मध्ये साक्षी ध्यान शिकण्यासाठी त्याच प्रमाणे चिंता, मंत्रचळ, औदासीन्य, भीतीचे झटके, मानसिक तणाव यावरील उपचार म्हणून स्वतंत्र प्रोग्राम आहेत. त्यामध्ये सरावासाठी ऑडियो आणि ऑन लाइन समुपदेशन उपलब्ध असते. गर्भवती स्त्रियांसाठी देखील साक्षी ध्यान शिकण्यासाठी यामध्ये स्वतंत्र प्रोग्राम आहे. त्याचा फायदा आई आणि बाळ दोघांनाही होतो.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
Email: yashwel@gmail.com