
स्ट्रेट-फॉर-वर्ड (कंटेंट क्रिएटर्स)
आम्ही शब्दाला किंमत देणारी माणसं आहोत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमधे दर्जेदार आणि परिणामकारक शब्दांचा वापर करायचा असेल, म्हणजेच परिणामकारक कॉपी रायटींग आणि कंटेंट क्रिएशन करून हवं असेल, तर आम्हाला शब्द टाका! तुमचा शब्द आम्ही अगदी नक्की खाली पडू देणार नाही!

स्ट्रेट-फॉर-वर्ड ही कंपनी कंटेंट क्रिएशनच्या व्यवसायात आहे. कंटेंट म्हणजेच मराठीत संहिता. जाहिरातींसाठी, कंपनीच्या अंतर्गत मासिकांसाठी, न्यूज लेटर्स साठी, वेब साईट साठी संहिता तयार करून द्यायचं काम स्ट्रेट-फॉर-वर्ड करते. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून हे काम केलं जातं.
स्ट्रेट-फॉर-वर्डचे संचालक मिलिंद जोशी हे स्वत: प्रस्थापित लेखक आहेत. मराठीत त्यांची तीन पुस्तकं आणि कित्येक कथा, लेख असं प्रकाशित साहित्य आहे. याशिवाय इंग्रजीतही त्यांचं बरंच लिखाण आहे. वेगवेगळ्या नियत कालिकांमधून त्यांचं हे लिखाण वेळोवेळी प्रसिद्ध होत असतं. त्याच बरोबर सामुद्रीय प्रदूषणाबद्दलही त्यांचा बराच अभ्यास आणि लिखाण आहे.
स्ट्रेट-फॉर-वर्ड ही मिलिंद जोशींनी कंटेंट क्रिएशनसाठी उघडलेली संस्था आहे. कंटेंट क्रिएशनच्याशिवाय स्ट्रेट-फॉर-वर्ड इंग्लिश, मराठी आणि जर्मन भाषांतराचंही काम स्वीकारते. याशिवाय वेब डिझाईनिंग, ब्रोशर डिझाईनिंग, मार्केटींग कन्सल्टन्सी अशा प्रकारची कामं सुद्धा स्ट्रेट-फॉर-वर्ड स्वीकारते आणि यशस्वीरित्या पूर्ण करते.
आपल्याला अशा प्रकारच्या किंवा कंटेंट क्रिएशनच्या कुठल्याही प्रकारच्या सेवेची गरज असेल तर स्ट्रेट-फॉर-वर्डशी जरूर संपर्क करा. आपल्याला आमच्या कामातून पूर्ण समाधान मिळेल याची खात्री देतो.
स्ट्रेट-फॉर-वर्ड
द्वारा – मिलिंद जोशी
फोन – 9930904824 / 9404458208
मेल – milind@magnifolia.in